छत्रपती संभाजीनगर, ता. ६: घिसाडी (तेर्मा) बहुउद्देशीय संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घिसाडी समाजातील यूपीएससी उत्तीर्ण आयएफएस अधिकारी अक्षय पवार (पाथर्डी) यांच्यासह समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा ‘गुणगौरव सोहळा रविवारी (ता.७) सकाळी १०.३० वाजता एमआयटी कॉलेज परिसरातील आनंद हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू चव्हाण राहणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून घिसाडी (तेर्मा) बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे (सोलापूर) व सचिव संजय सोळंके (दर्यापूर) उपस्थित राहणार आहेत.
यावेळी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आयएफएस अधिकारी बनलेल्या अक्षय पवार (पाथर्डी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्र, दयानंद महाविद्यालय, लातूरचे संचालक प्रा. डॉ. अंकुशराव चव्हाण, शिरूर येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. ईश्वर पवार मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने होणार असून, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांच्या चमूकडून स्वागतगीत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार केला जाईल.
प्रास्ताविक दीपक चव्हाण (लोणार) करणार असून, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, गुणवंतांचा सत्कार, मनोगत आणि अध्यक्षीय समारोप असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सूत्रसंचालन दीपक चव्हाण व विलास पवार करणार आहेत, तर पत्रकार राजेश सोळंके, महेंद्र चव्हाण आभार मानतील.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
यूपीएससी उत्तीर्ण अक्षय पवार यांच्यासह आज गुणवंतांचा गौरव सोहळा
Related Posts
Add A Comment

