छत्रपती संभाजीनगर, दि. 05जून: (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
सेवन हिल परिसरातील अतिक्रमण निर्मूलन कारवाईनंतर सोशल मीडियावर एका दिव्यांग महिलेबाबत दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन तिची परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर तिला दिव्यांग नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
आयुक्तांच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित महिलेचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून दिले. तसेच तिचे बँक खाते उघडून देण्यात आले. याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तयार करण्यात आला असून मतदान ओळखपत्रासाठीही अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत.
आज आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते संबंधित महिलेला दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच दिव्यांग नागरिकांसाठीच्या उदरनिर्वाह भत्त्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. यामुळे महानगरपालिकेने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण केले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उप आयुक्त लाखिचंद चव्हाण, महिला व बाल कल्याण अधिकारी विनोद परदेसी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील.
महानगरपालिकेच्या या संवेदनशील आणि सकारात्मक हस्तक्षेपामुळे संबंधित महिलेला आर्थिक आधार मिळण्यासोबतच तिचे जीवन अधिक सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण; दिव्यांग महिलेला प्रमाणपत्र, बँक खाते व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध
Related Posts
Add A Comment

