Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»अपघात प्रकरणातील कागदपत्रांसाठी 10 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह होमगार्ड जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर

अपघात प्रकरणातील कागदपत्रांसाठी 10 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह होमगार्ड जाळ्यात

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

बीड/जालना, दि. 6 जून: अपघात प्रकरणातील विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आणि एका होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जालना पथकाने रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचा 6 मार्च 2026 रोजी झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अपघाताशी संबंधित कागदपत्रे विमा दाव्यासाठी आवश्यक होती. ती उपलब्ध करून देण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय साहेबराव बळवंत (वय 41) यांनी सुरुवातीला 15 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 10 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 3 जून रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 6 जून रोजी सापळा रचण्यात आला.
सापळ्यादरम्यान पोलीस हवालदार दत्तात्रय बळवंत यांनी लाचेची रक्कम होमगार्ड रशिद दगडुखा पठाण (वय 52) यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रशिद पठाण याला पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
दोन्ही संशयितांची अंगझडती घेण्यात आली असून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच घरझडतीची प्रक्रिया सुरू असून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे करीत आहेत. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्याच्या वतीने खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ तक्रार करावी.
संपर्क
📞 टोल फ्री : 1064
📱 व्हॉट्सअॅप : 9764021064
📞 पोलीस अधीक्षक, ACB छत्रपती संभाजीनगर : 9011092777
📞 पोलीस उपअधीक्षक, ACB जालना : 9881463365

#ACB #BriberyTrap #Beed #NeknoorPolice #MaharashtraNewsTimes #AntiCorruptionBureau #CrimeNews #Maharashtra
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.