“मोठी स्वप्ने बघा; ती पूर्ण करण्यासाठी पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे” – पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव
छत्रपती संभाजीनगर, दि. 6 जून 🙁 प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी पोलीस मुख्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जाधव होते, तर प्रशांत स्वामी प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले. “यश हे सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचे फलित असते. मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या उच्च शिक्षणासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी मदत करेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पालकांच्या कर्तव्यनिष्ठेचा अभिमान वाटत असल्याचे सांगत, हा सत्कार भविष्यात आणखी मोठे यश मिळविण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
गौरव प्राप्त विद्यार्थी
कु. अनुष्का दत्तात्रय सुयवंशी – 95.40% (CBSE)
कु. सारिका योगेश तरमाळे – 94.80%
चि. ओमकार दत्तात्रय सुयवंशी – 94.76% (CBSE)
चि. हर्षल सुनिल पवार – 94.00%
चि. देवेन विनोद पदमणे – 93.20%
चि. सिद्धांत सुनिल ठोंबरे – 93.00%
कु. आकांक्षा महेश घुगे – 92.06%
कु. तनुजा शिवाजी मुदेवाड – 91.60%
चि. रुषी भानुदास चव्हाण – 91.60%
पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांचे मनोबल वाढविण्यासह इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण पोलीस कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरला.






