छत्रपती संभाजीनगर, दि. ६ जून – छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मनाशी बाळगत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देत कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सहकार चळवळ अधिक बळकट करून जिल्ह्यातील सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अतुल सावे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, आण्णासाहेब माने यांच्यासह सुहासभाऊ सिरसाठ, संजयभाऊ खंबायते, श्रीराम बाबा शेळके, सर्जेराव मेटे, सांडू अण्णा जाधव, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भूमिका मांडत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
— महाराष्ट्र न्यूज टाईम
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२६ : उमेदवारी अर्ज दाखल
Related Posts
Add A Comment

