छत्रपती संभाजीनगर, दि. – औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निवडणुकीत उमेदवार अनिल भैय्या बोरसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत कल्याणराव काळे, संदीप दादा बोरसे, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, संतोष मेटे यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार बंधू, समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. उपस्थितांनी अनिल भैय्या बोरसे यांना शुभेच्छा देत निवडणुकीत यश मिळविण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
या प्रसंगी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मतदार प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून आगामी काळात निवडणूक प्रक्रिया अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; अनिल भैय्या बोरसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
Related Posts
Add A Comment

