फुलंब्री, दि. ६ जून – अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरोधात पोलीस ठाणे वडोदबाजार यांनी मोठी कारवाई करत एक टाटा हायवा ट्रक आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे वडोदबाजार हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ५ जून २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
टाटा हायवा ट्रकसह ३०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पहिल्या कारवाईत पोलिसांनी अवैध वाळूची वाहतूक करणारा टाटा हायवा ट्रक रंगेहात पकडला. वाहनासह वाळू असा ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करीत आहेत.
बाबरा येथे दोन ट्रॅक्टर पकडले
दुसऱ्या कारवाईत बाबरा परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रॅक्टर व वाळूसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शंकर चव्हाण करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि विजयसिंग जोनवाल, पोउपनि सचिन क्षीरसागर, श्रेणी पोउपनि शंकर चव्हाण, सहाय्यक फौजदार नागलोद, पोलीस हवालदार खाकरे, वाघ तसेच पोलीस अंमलदार मोरे व सपकाळ यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वडोदबाजार पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; ४०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Related Posts
Add A Comment

