महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी बातमी:
छत्रपती संभाजीनगर, दि. 5 जून – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष व प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे भव्य राज्याभिषेक सोहळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
या भव्य सोहळ्याचे आयोजन डॉ. बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, शिवप्रेमी, युवक, महिला तसेच सर्व नागरिकांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता. हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक मानला जातो आणि दरवर्षी राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सोहळ्यात शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व, महाराजांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करण्यात येणार असून, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
– दिनेश गायके
संपादक, महाराष्ट्र न्यूज टाईम

