टपाल सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींसाठी नागरिकांना मिळणार थेट न्यायाचे व्यासपीठ
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (महाराष्ट्र न्यूज टाईम्स) : टपाल सेवांबाबत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे दि. ८ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्टर जनरल कार्यालयात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.
टपाल विभागाकडून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने ही विशेष तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली असून, पोस्टल सेवा, पार्सल, पत्रव्यवहार, मनी ऑर्डर, बचत बँक खाती व विविध प्रमाणपत्रांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करण्यात येणार आहे.
गेल्या सहा आठवड्यांत ज्यांच्या तक्रारींचे निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशाच तक्रारींची दखल या डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे.
तक्रारदारांनी मूळ तक्रारीची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम यासह संपूर्ण तपशील नमूद करून तक्रारीच्या दोन प्रती श्री. भगवान नागरगोजे, सहायक संचालक डाक सेवा (जनशिकायत), पोस्टमास्टर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर – ४३१००२ येथे पाठवाव्यात, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
📮 डाक अदालत : ८ जून २०२६
🕒 वेळ : दुपारी ३.०० वाजता
📍 ठिकाण : पोस्टमास्टर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
📦 पार्सल, पत्र, मनी ऑर्डर, बचत खाते आदी तक्रारींचा समावेश
📄 तक्रारीच्या दोन प्रती सादर करणे आवश्यक



