खुलताबाद, दि. ५ जून (महाराष्ट्र न्यूज टाईम्स) – खुलताबाद तालुक्यातील पिंपरी शिवारात एका शेततळ्यात १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव गौरव (उर्फ साई) बाबूलाल घृनावत (वय १४) असे असून तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे घृनावत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, हा अपघाती मृत्यू नसून शेतीच्या वादातून आपल्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत मुलाचे वडील बाबूलाल घृनावत, आई तसेच इतर नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, मृत मुलाचे वडील बाबूलाल घृनावत यांनी १६ मे रोजी शेतीच्या वादासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मृत्यूकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असून तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे पिंपरी गावासह संपूर्ण खुलताबाद तालुक्यात शोककळा पसरली असून, सत्य समोर येण्यासाठी पोलीस तपासाची प्रतीक्षा केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पिंपरी शिवारातील शेततळ्यात १४ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा आरोप
Related Posts
Add A Comment

