छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगरने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेंतर्गत एमआयडीसी चिखलठाणा परिसरात गुरुवारी (दि. ४ जून) मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त केला.
FDA पथकाने एमआयडीसी चिखलठाणा येथील प्लॉट क्रमांक E-16/01/03 वरील एम/एस राज महल आईस्क्रीमच्या गोडाऊनची तपासणी केली. तपासणीदरम्यान साठवून ठेवलेल्या आईस्क्रीमच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने नमुने घेऊन मोठा साठा जप्त करण्यात आला.
कारवाईत ‘शाही गुलाब’ फ्लेवरचे ९८.८ किलो (मूल्य ₹२२,७२४) आणि ‘मँगो’ फ्लेवरचे ८८.८ किलो (मूल्य ₹२०,४२४) असे एकूण १८७.६ किलो आईस्क्रीम जप्त करण्यात आले. जप्त मालाची एकूण किंमत ₹४३,१४८ इतकी आहे.
या प्रकरणात नरेशकुमार मदनलाल जाट (वय ३५ वर्षे) यांचे नाव समोर आले असून जप्त केलेल्या आईस्क्रीममध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
FDA ने जप्त केलेल्या आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
संशयित भेसळयुक्त आईस्क्रीमचा साठा जप्त; एमआयडीसी चिखलठाणा येथे FDA ची धडक कारवाई
Related Posts
Add A Comment

