छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रलंबित अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. जून महिन्यातील पहिले शिबिर ५ जून रोजी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तालुका स्तरावर तहसीलदार, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही शिबिरे घेण्यात येतील. कर्मचाऱ्यांच्या वेतन, पदोन्नती, रजा, निवृत्तीवेतन, सेवा पुस्तिका अद्ययावत करणे यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवर या शिबिरांमध्ये सुनावणी होऊन त्वरित कार्यवाही केली जाणार आहे.
पहिला शुक्रवार सुट्टीचा असल्यास त्याआधीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. संबंधित कार्यालयांनी प्रलंबित सेवा विषयक प्रकरणांची अद्ययावत यादी तयार करून ती शिबिरात सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे जलद निवारण होऊन प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’; प्रलंबित सेवा विषयक तक्रारींना मिळणार वेगवान न्याय
Related Posts
Add A Comment

