छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संशयित अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई करत गजानन नगर येथील मे. प्रसन्ना डेअरी अँड फूड्स या आस्थापनावर छापा टाकला. या कारवाईत सैल (लूज) गायीचे तूप संशयित आढळून आल्याने तब्बल १८ हजार १५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रमोद नाथा निमसे (वय ३६) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी एस. टी. जाधवर, कीर्तिका झाडे आणि योगेश चिभडे यांनी संयुक्तपणे केली. सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील व सहआयुक्त एस. आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
एफडीएने नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थांचा वापर करण्याचे आवाहन केले असून भेसळयुक्त किंवा संशयित अन्नपदार्थांची माहिती तातडीने प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले आहे.
🥛 भेसळयुक्त दूध किंवा तूप ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती
दुधाचा थेंब चाचणी: गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा थेंब टाकल्यास शुद्ध दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरी रेघ सोडते. भेसळयुक्त दूध लगेच पसरते.
उकळण्याची चाचणी: शुद्ध दूध उकळल्यावर वर जाडसर साय येते. भेसळयुक्त दुधात साय कमी किंवा नसते.
तुपाचा सुगंध: शुद्ध गायीच्या तुपाला नैसर्गिक सुगंध असतो. भेसळयुक्त तुपामध्ये तेलकट किंवा कृत्रिम वास जाणवू शकतो.
तळहात चाचणी: तुपाचा थोडासा भाग तळहातावर चोळल्यास शुद्ध तूप पटकन वितळते व नैसर्गिक सुगंध येतो.
पाण्यात विरघळण्याची चाचणी: कोमट पाण्यात तूप टाकल्यास शुद्ध तूप वर एकसारखे तरंगते. भेसळ असल्यास वेगवेगळे थर दिसू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, घरगुती चाचण्या प्राथमिक संकेत देऊ शकतात; मात्र भेसळ निश्चितपणे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणीच सर्वात विश्वसनीय असते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
संशयित गायीचे तूप जप्त; एफडीएची प्रसन्ना डेअरी अँड फूड्सवर कारवाई
Related Posts
Add A Comment

