Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»अनुदानित खत खरेदी आता मोबाईल ॲपद्वारे; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जूनपासून नवीन प्रणाली लागू
छत्रपती संभाजीनगर

अनुदानित खत खरेदी आता मोबाईल ॲपद्वारे; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जूनपासून नवीन प्रणाली लागू

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 4 जून : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरण अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी “नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” हा पथदर्शी प्रकल्प 5 जून 2026 पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीसाठी आता “Framework For Fertilizer Sale” या मोबाईल ॲपचा वापर करावा लागणार आहे. सदर ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत खरेदीपूर्वी ॲपद्वारे बुकिंग करणे आवश्यक राहणार आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, या नवीन प्रणालीमध्ये ॲग्रीस्टॅक (Farmer ID) आणि खत वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या IFMS प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर खरेदी होणाऱ्या अनुदानित खताची अचूक नोंद राहणार आहे.

QR कोडद्वारे खत वितरण

शेतकऱ्याने ॲपवरून आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रावर खताची बुकिंग केल्यानंतर त्याला QR कोड प्राप्त होईल. बुकिंग केलेले खत संबंधित कृषी सेवा केंद्रात तीन दिवस शेतकऱ्याच्या नावावर राखीव ठेवले जाईल. या कालावधीत शेतकऱ्याने QR कोड स्कॅन करून खताची उचल करावी लागेल.

गैरवापराला बसणार आळा

या प्रणालीमुळे अनुदानित खतांचे समन्यायी वाटप होण्यास मदत होणार असून खतांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

प्रशिक्षण व जनजागृती मोहीम

या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कृषी सेवा केंद्र चालकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्व तालुक्यांतील पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकरी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात.

शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप डाउनलोड करून त्याद्वारेच अनुदानित खताची बुकिंग व खरेदी करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.