छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित लिंगायत प्रीमियर लीग (LPL) 2026 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला. या अंतिम सामन्यात पोखरी टीम सोलापूर संघाने जालना C.C. संघाचा २ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत सुमारे ४० संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये लिंगायत वॉरियर्स, जनसेवा क्रीडा मंडळ, कोष्टी ११, मोयाष C.C., महाकाल वॉरियर्स, माही फायटर्स तसेच जळगाव, लातूर आदी ठिकाणांतील संघांनी आकर्षक खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे, सचिन खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष बसवराज मंगरुळे, गोविंद सोलापुरे, रमेशअप्पा कोठुळे, प्रदीपजी साखरे, लक्ष्मणअप्पा लिम्बारे, सुरजभैय्या कान्होडे, डॉ. मयूर सोनवणे, स्वप्नील हट्टे आणि प्रितेशभैय्या जैस्वाल यांची उपस्थिती होती.
स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मितेश थत्तेकर, कैलास साखरे, उमाकांत शिराळे, स्वप्नील सुपारे, सूर्यकांत वैद्य, उदय लिम्बारे, अभिषेक ठेंगे, सोसेअप्पा, अजय लाकडे, शिवानंद मोध्ये, राजेश कोठळे, शिवाअप्पा खंडकुळे आणि पंचप्रमुख पंकज बेंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांचेही मोलाचे योगदान लाभले. यावेळी उपस्थित मान्यवर, खेळाडू, प्रेक्षक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सकल लिंगायत समाज क्रिकेट कमिटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
लिंगायत प्रीमियर लीग 2026 क्रिकेट स्पर्धेत पोखरी टीम सोलापूर विजेता
Related Posts
Add A Comment

