छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीडनाशके योग्य दरात व वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन केले असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी विभागीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
तंत्र अधिकारी ए. एल. काळुशे यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून पी. ए. ताजने (मोहीम अधिकारी), एच. एस. कातोरे (जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक) हे सदस्य आहेत. एस. जी. बंडगर यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी निविष्ठांची साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येणार असून गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विभागीय स्तरावर तक्रार निवारण कक्षही सुरू करण्यात आला आहे. निविष्ठांची उपलब्धता, गुणवत्ता किंवा इतर अडचणींबाबत शेतकरी ९४२१२३३२७० या मोबाईल क्रमांकावर किंवा १८००२३३४००० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; दर्जेदार बियाणे, खते व औषधांसाठी भरारी पथकांची स्थापना
Related Posts
Add A Comment

