छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आढावा घेतला. त्यांनी नक्षत्रवाडी येथील ३२२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका आणि संबंधित कंत्राटदारांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, एरेशन, क्लोरीनेशन व फिल्टरेशन प्रकल्पांची पाहणी करत कामांच्या प्रगतीचा दररोज अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पळांडे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
१२ जूनपूर्वी शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी कामे पूर्ण करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
Related Posts
Add A Comment

