छत्रपती संभाजीनगर : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. (शेड्युल्ड बँक) यांच्या शिवाजीनगर शाखेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत दिशा स्क्वेअर (Disha Square), सूत गिरणीसमोर, गारखेडा परिसर, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि रक्तदानास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष उमेश दारारथी, पालक संचालक प्रशांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण नांदेडकर तसेच संचालक मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बँकेने परिसरातील नागरिक, ग्राहक आणि रक्तदात्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान व आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शाखाधिकारी प्रशांत जोशी व शिवाजीनगर शाखेचे कर्मचारी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यरत आहेत.
– महाराष्ट्र न्यूज टाईम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
देवगिरी बँकेच्या शिवाजीनगर शाखेचा २१ वा वर्धापन दिन; रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन
Related Posts
Add A Comment

