छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला विशेष निर्देश दिले आहेत. मतदान केंद्रे, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्रांवर २४ तास सुरक्षा, संवेदनशील भागांत अतिरिक्त बंदोबस्त, अवैध शस्त्र व दारुगोळा वाहतुकीवर कडक नजर तसेच निवडणूक नियमभंग करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव येऊ नये यासाठीही विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत

