छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध कृषी पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. आता शेतकरी krishi.maharashtra.gov.in� जाऊन घरबसल्या अर्ज करू शकतात.
या नव्या प्रणालीमुळे ऑफलाइन चार प्रतींमध्ये प्रस्ताव सादर करण्याची गरज संपुष्टात आली असून वेळ, खर्च आणि कागदपत्रांची पुनर्पूर्तता टळणार आहे. अर्जाची स्थितीही ऑनलाइन पाहता येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, उद्यानपंडित, युवा शेतकरी पुरस्कार आदी विविध कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, संस्था व गटांनी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना घरबसल्या सुविधा
Related Posts
Add A Comment

