छत्रपती संभाजीनगर, दि.01 (प्रतिनिधी) :प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या इंटर्नशिप दरम्यान त्यांना दरमहा 9 हजार रूपये इतके आर्थिय सहाय्य तसेच 6 हजार रूपयांचे एकरकमी अनुदान देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार असून छत्रपती संभाजीनगर विभागातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज करण्याचे आवाहन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त विद्या शितोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
पूर्ण वेळ नोकरित नसलेल्या व 18 ते 25 वर्षे दरम्यान वय असलेल्या उमेदवारांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेतील सहभागामुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायीक नेटवर्क तयार होणे, आत्मविश्वास व व्यक्तीमत्व विकास होण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अथवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, मालजीपुरा स्टेशनरोड, रिलायंस पेट्रोल पंपच्या बाजुला, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा.

