छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने १ जून २०२६ पासून शहरातील सर्व १० झोनमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी व्यापक अबेट मोहीम सुरू केली आहे. महापौर श्री. समीर राजुरकर व आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकांकडून घरभेटी, कंटेनर सर्वेक्षण, अबेट औषध फवारणी, ताप सर्वेक्षण व जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.
नागरिकांनी कुलर, फुलदाण्या, पाण्याच्या टाक्या व इतर पाणी साठवणाऱ्या ठिकाणांची नियमित स्वच्छता ठेवावी, आठवड्यातून एकदा पाणी बदलावे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. शहराला डेंग्यू-मलेरियामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मान्सूनपूर्व डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी महापालिकेची धडक अबेट मोहीम सुरू
Related Posts
Add A Comment

