छत्रपती संभाजीनगर, दि. १ जून – पुणे येथील अलीकडील गंभीर घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह विविध भागांत धडक कारवाया करण्यात आल्या असून अवघ्या २४ तासांत ५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ५० आरोपींना अटक करण्यात आली असून ‘क’ विभागातील एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच ‘एफ’ विभागातून ९० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान १५९.७६ बॉक्स लिटर देशी दारू, ३८४ लिटर हातभट्टी/गावठी दारू आणि ४५ लिटर ताडी जप्त करण्यात आली. याशिवाय अवैध मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे ३,०७० लिटर रसायन जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
विभागाने या मोहिमेत एकूण ₹३,८५,०१५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹१,१३,४८५ किमतीचे मद्य, ₹४३,७६० किमतीचे रसायन, ₹९०,००० किमतीचे वाहन आणि ₹२३,१८० किमतीचे इतर साहित्य यांचा समावेश आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की, अवैध मद्य व्यवसायाची साखळी पूर्णपणे नष्ट होईपर्यंत अशा कठोर कारवाया सुरूच राहतील. बेकायदेशीर मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
नागरिकांनी अवैध मद्यविक्री किंवा संबंधित माहिती असल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाईम
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पुणे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये; २४ तासांत ५१ गुन्हे दाखल
Related Posts
Add A Comment

