छत्रपती संभाजीनगर, दि. १ जून – गंगापूर व महालगाव येथील तरुण मित्रांच्या कारला आज (सोमवारी) सकाळी सुमारे ६:३० वाजता मध्य प्रदेशातील सेंदवा टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेंदवा येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की जखमी झालेल्या चारही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप, संदीप साबणे, भगवान हिवाळे आणि अनिल काळे यांनी तत्काळ सेंदवाकडे धाव घेतली असून जखमी तरुणांच्या मदतीसाठी आवश्यक समन्वय सुरू केला आहे.
या दुर्घटनेमुळे गंगापूर व महालगाव परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी तरुणांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाईम
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सेंदवा टोल नाक्याजवळ भीषण कार अपघात; गंगापूर-महालगावातील चार तरुण गंभीर जखमी
Related Posts
Add A Comment

