छत्रपती संभाजीनगर, दि. 1 जून 2026: समाजाच्या सुरक्षिततेसाठी आयुष्याची तीन ते चार दशके समर्पित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील 13 अधिकारी व अंमलदारांना आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष गौरव सोहळ्यात सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या दीर्घ व उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांसह कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार
पोलीस उपअधीक्षक शेषराव आबाजी उदार
रा. पो. नि. अण्णा खेलु वाघमोडे
पोउपनि दिलीप राधाकिसन चौरे
श्रे. पोउपनि रज्जाक हुसेनभाई शेख
श्रे. पोउपनि शिवाजी पुंजाराम दगडघाटे
श्रे. पोउपनि गोविंद गणपत राऊत
पोउपनि दगडू बाळू तडवी
सफौ सुरेश किसन तायडे
सफौ शिवाजी अप्पाराव काळे
सफौ विष्णू भानुदास गायके
पोहेकॉ हरिकृष्ण लक्ष्मणराव मोरे
सफौ वसंत बालाजी कुलकर्णी
हेडकुक हुसेनखाँ सरदारखाँ पठाण
“पोलीस दल हे त्यांचे कुटुंबच राहील” – पोलीस अधीक्षक
मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. “या अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सण-उत्सवांची पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांचे कर्तव्यनिष्ठ कार्य आणि शिस्त नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे. गणवेशातून निवृत्त झाल्यानंतरही पोलीस दल हे त्यांचे कुटुंबच राहील,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी निवृत्त अधिकाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा तसेच कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा सल्ला दिला.
सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाभांचे वितरण
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर अनुज्ञेय लाभ मिळविण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सर्व लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच वितरित करण्यात आले. या उपक्रमाबद्दल निवृत्त अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
पाल्यांच्या भावना अन् अभिमान
कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांनी व्यक्त केलेल्या भावना उपस्थितांना भावूक करून गेल्या. “समाजाच्या सुरक्षेसाठी वडिलांनी अनेक सण-उत्सव कुटुंबापासून दूर राहून साजरे केले. आता ते कायमस्वरूपी आमच्यासोबत असतील, याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सजविलेल्या वाहनातून घरपोच पाठवणी
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना घरी सोडण्यासाठी फुलांनी आणि शुभेच्छा फलकांनी सजविलेली विशेष पोलीस वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय सहाणे, प्र. पोलीस उपअधीक्षक विनय सोनावणे, पोलीस निरीक्षक (कल्याण) आरती पवार, पोलीस निरीक्षक (एमटी) धनंजय फराटे, संतोष वायचळ तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
— महाराष्ट्र न्यूज टाईम
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कर्तव्यपूर्तीचा सन्मान; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील 13 अधिकारी-अंमलदारांचा भावपूर्ण निरोप
Related Posts
Add A Comment

