मुंबई | महाराष्ट्र न्यूज टाइम्स
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये छापेमारी करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक दुकाने व गोदामे सील करण्यात आली आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक कारवाईही करण्यात आली आहे.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
FDA ची राज्यभर धडक कारवाई; गुटखा माफियांमध्ये खळबळ
Related Posts
Add A Comment

