छत्रपती संभाजीनगर, दि. १ जून २०२६ (प्रतिनिधी)
पैठण धरण परिसरात बुडालेल्या एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या पथकाने शोधून बाहेर काढत पैठण पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत मोनू भारती (वय १७, रा. गली क्रमांक ७, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) हा युवक पैठण धरणात बुडाल्याची माहिती सकाळी सुमारे ७.२५ वाजता प्राप्त झाली. पीएसआय सारंग यांनी दिलेल्या सूचनेनंतर पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन जवानांनी शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी पैठण पोलिसांच्या ताब्यात दिला.
ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उप अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. विजय राठोड, प्रभारी उप अग्निशमन अधिकारी श्री. एच. वाय. घुगे तसेच अग्निशामक जवान अजिंक्य भगत, दिनेश मुंगसे, छगन सलामबाद, मंसूरराव सबकाल, प्रणाल सूर्यवंशी आणि वाहन चालक सोमेश बचाटे यांनी सहभाग घेतला.
पैठण पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पैठण धरणात बुडालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृतदेह बाहेर; अग्निशमन दलाची तत्पर कारवाई
Related Posts
Add A Comment

