पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती कमी कराव्यात या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) यांच्या वतीने आज, सोमवार दि. १ जून २०२६ रोजी राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे पैठण गेट परिसरात सायंकाळी ५.०० वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा आर्थिक भार याविरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
महत्त्वाचे
आंदोलन: महागाईविरोधी निदर्शने
आयोजक: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)
स्थळ: पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर
दिनांक: १ जून २०२६ (सोमवार)
वेळ: सायंकाळी ५.०० वाजता

