छत्रपती संभाजीनगर 1जून2026 (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांचा सत्कार करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपने नुकतीच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सुहास शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून संधी दिली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिरसाट यांच्या जनतेप्रती असलेल्या बांधिलकी, संघटन कौशल्य आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाला सक्षम व अभ्यासू प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी श्री. अतुलजी चव्हाण साहेब, सभापती श्री. सर्जेराव मेटे, ज्येष्ठ नेते श्री. सांडू आण्णा जाधव, भाजप मंडळ अध्यक्ष श्री. गोपाळ वाघ, भाजप मंडळ अध्यक्ष श्री. सुचित बोरसे, नगरसेवक श्री. योगेश मिसाळ, पंचायत समिती सदस्य श्री. बाळासाहेब तांदळे, श्री. गजानन नागरे, श्री. आनंदा ठोके, श्री. नाथा आप्पा काकडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सुहास शिरसाट यांच्या उमेदवारीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत विजयासाठी संघटनात्मक तयारीला वेग आला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
श्री सुहास शिरसाट यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी; कार्यकर्त्यांकडून सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव
Related Posts
Add A Comment

