वैजापूर प्रतिनिधी : खंडाळा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील केके हॉटेल कॉर्नरजवळ आज सायंकाळी भीषण अपघात झाला. सिल्लोड-नाशिक मार्गावरील बस आणि मारुती सुझुकी रिट्झ कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कारमधील पाचही प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलवाडा व वाकला परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाकडून काही कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नसून संबंधित यंत्रणेकडून माहितीची प्रतीक्षा आहे.
अधिक माहितीसाठी प्रतीक्षा…
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खंडाळा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बस व कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी
Related Posts
Add A Comment

