सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव तालुक्यातील कीन्ही परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी तब्बल १५ ते २० मिनिटे गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
अचानक झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील शेतपिकांना फटका बसला असून कापूस, मका, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या.
गारपिटीचा मारा इतका तीव्र होता की शेतांमध्ये आणि रस्त्यांवर गारांचा पांढरा थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.
महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सोयगाव तालुक्यातील कीन्ही परिसरात वादळी पावसासह जोरदार गारपीट; शेती पिकांचे मोठे नुकसान
Related Posts
Add A Comment

