फुलंब्री प्रतिनिधी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००१ व्या जयंतीनिमित्त फुलंब्री तालुक्यातील वारेगाव आणि किनगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
वारेगाव येथे आयोजित कार्यक्रमास सभापती श्री. संदीप दादा बोरसे, श्री. बबनराव जाधव, श्रीमती कांता बापू जाधव, श्री. दिनकर भाऊ बकाल, श्री. दादासाहेब बापू बोरसे, श्री. जगन भाऊ बकाल, श्री. सुधाकर बापू जाधव, श्री. सुधाकर बकाल, श्री. तेजराव जाधव, श्री. संजय नजन, श्री. उद्भव नाला जाधव, श्री. गणेश नजन, श्री. काकासाहेब निमकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३००१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. अमोल सोनवणे, श्री. योगेश नजन, श्री. पांडुरंग नजन, श्री. राहुल नजन, श्री. किशोर चव्हाण, मा. उपसरपंच श्री. विष्णू नजन, श्री. अरुणराव टाकते, श्री. योगेश अशोकराव चव्हाण, श्री. प्रशांत चव्हाण, श्री. श्रीकांत चव्हाण, श्री. किशोर कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

