महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वेवार्षिक निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम निर्गमित केलेल्या वेळेपासून व दिनांकापासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. वरील आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरिता जिल्ह्यांच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील असे नमूद आहे.
शासन परिपत्रक क्र. प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ मंत्रालय, मुंबई – 32 दिनांक 26 सप्टेंबर 2012 मधील मुद्दा क्र.5.7 अन्वये ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अश्या ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे नमूद आहे.
सबब मा.राज्य निवडणूक आयोगाचे पत्र व शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार महानगरपालिका स्तरावरील दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा महानगरपालिका लोकशाही दिन दिनांक:- 01-06-2026 रोजी आयोजित केला जाणार नाही याची नौद घेऊन त्याची आपले स्तरावर व्यापक प्रसिद्धी करावी ही विनंती.

