छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी पुंडलिकनगर परिसरात पाण्याच्या वापराबाबत दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानित केले तसेच धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पाण्याच्या वादातून शेजाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ; पुंडलिकनगर पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा
Related Posts
Add A Comment

