छत्रपती संभाजीनगर, दि. 29 : पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून आदी उड्डाण क्रियांवर बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला असून, ही बंदी 30 मे ते 28 जुलै या कालावधीत लागू राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

