छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे पिसादेवी येथील बहुचर्चित जनार्धन कासारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी महादू औताडे याला विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जमिनीच्या वादातून 2022 मध्ये झालेल्या या खुनातील भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पैरवीमुळे आरोपी दोषी ठरला.
महिलेवर हल्ला व बलात्काराच्या प्रयत्नातील आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी
घारदोन येथील महिलेवर प्राणघातक हल्ला करून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी अभिषेक नवपुते याला सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व एकूण 38 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ई-साक्ष प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्कम पुरावे गोळा केले होते.
दोन्ही प्रकरणांतील यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी तपास अधिकारी, सरकारी अभियोक्ता व कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

