सिल्लोड, प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ड्रीम पॅलेस हॉटेलजवळ आज दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठीही स्थानिकांनी प्रयत्न केले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स नागरिकांना वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करण्याचे आणि महामार्गावर सतर्कता बाळगण्याचे आवाहन करत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
चिंचखेडा येथे बस-कारची जोरदार धडक; कारचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली
Related Posts
Add A Comment

