पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीत सध्या सोलर पंप केबल, इलेक्ट्रिक मोटार, शेती अवजारे तसेच पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस प्रशासनाने नागरिक व शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः बोकूड जळगाव व लाखेगाव शिवार परिसरात सोलर पंपाच्या तांब्याच्या केबल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी चोरटे शेतातील मौल्यवान साहित्य लक्ष्य करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामुळे शेतकऱ्यांनी सोलर पंप, मोटार, केबल व शेती साहित्य सुरक्षित ठेवावे, रात्री गस्त वाढवावी, गावपातळीवर गस्त पथक तयार करावे तसेच संशयित व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शेत परिसरात CCTV बसविणे, लाईट व्यवस्था सुरू ठेवणे व सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
“सतर्क नागरिक – सुरक्षित गाव” या संदेशासह बिडकीन पोलिसांनी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बिडकीन पोलिसांचे शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; सोलर केबल चोरीच्या घटनांत वाढ
Related Posts
Add A Comment

