छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या 48 तासांत जेरबंद केले आहे. पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरात उघडकीस आली.
25 मे रोजी कच्ची घाटी परिसरात एका 25 ते 27 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित शेख फैयाज शेख मेहमूद (वय 26) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मृत शेख आवेश हा आरोपीचा मित्र होता. आरोपीच्या पत्नीची छेड काढल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून आरोपीने दगडाने वार करून मित्राची हत्या केल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; आरोपीला 48 तासांत अटक
Related Posts
Add A Comment

