छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
सोनाराला अडवून चाकूचा धाक दाखवत सोने-चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अजिंठा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपी दत्ता सुनिल राऊत, रोशन ऊर्फ सोनू कैलास सुरडकर आणि लखन शालीग्राम सूर्यवंशी यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल तसेच एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. आरोपींनी अंभई घाट परिसरात सोनाराला अडवून मारहाण करत लूट केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक Prakash Jadhav यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व त्यांच्या पथकाने केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सोनाराला चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद; ६.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Related Posts
Add A Comment

