मुंबई | प्रतिनिधी
राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, वनक्षेत्रालगतच्या एक हजार गावांमध्ये एआय आधारित अलर्ट यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री Ganesh Naik यांनी दिली.
या आराखड्याअंतर्गत राज्यात १० अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, २ रेस्क्यू सेंटर, १० ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तसेच २० रॅपिड रेस्क्यू टीम उभारण्यात येणार आहेत.
वन्य प्राण्यांच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना तातडीने मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच गावांमध्ये दोन हजार प्राथमिक प्रतिसाद दले तयार करण्यात येणार असून, शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर, माकडे व हरणांना पकडण्यासाठी विशेष फिरती पथकेही तयार करण्यात येणार आहेत.
या उपाययोजनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वन्य प्राण्यांच्या हालचालींसाठी राज्यात एआय अलर्ट यंत्रणा
Related Posts
Add A Comment

