छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था अर्थात CIPET येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध प्लास्टिक्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२६ पर्यंत आहे.
दरवर्षी ऑल इंडिया स्तरावर घेतल्या जाणाऱ्या CIPET Admission Test (CAT) च्या माध्यमातून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. यावर्षी प्रवेश परीक्षा ७ जून २०२६ रोजी होणार असून, परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
संस्थेमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (DPMT) हे तीन वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच बी.एस्सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग (PGD-PPT) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू आहे. अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाईन (PD-PMD) हा १८ महिन्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
संस्थेत अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्लास्टिक प्रोसेसिंग व टेस्टिंग विभाग तसेच प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
“सिपेट” अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मे
Related Posts
Add A Comment

