Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सुविधा बांधकामास राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची मंजुरी भाविकांना मिळणार विविध सुविधा
छत्रपती संभाजीनगर

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सुविधा बांधकामास राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची मंजुरी भाविकांना मिळणार विविध सुविधा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर: दि,२६(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सुविधा मध्ये वाढ करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील नियंत्रित क्षेत्रात (Regulated Area) भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या G+1 मजली भव्य बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA)अधिकृत मंजुरी दिली आहे. सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सक्षम प्राधिकारी कार्यालय (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांनी २५ मे २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत मंजुरी पत्र (Form IV) निर्गमित केले आहे.

नवी दिल्ली येथे दि. २० मे २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या ५१९ व्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यांनी याबाबत सादरीकरण केले होते. यावेळी अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विनोद अग्रवाल, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, संचालक कर्नल एस. मारवाह, महासंचालक यदुवीर रावत, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भातील प्रस्ताव दाखल केला होता.

यात ५ हजार चौ. मीटरपेक्षा मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भव्य सभा मंडप

वेरूळ येथील गट क्र. ४ मध्ये होणाऱ्या या नियोजित प्रकल्पात भाविकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. मंजूर नकाशांनुसार विविध विभागांचे चटईक्षेत्र (Floor Area) खालीलप्रमाणे असेल,शॉपिंग कॉम्प्लेक्स, ५१३२.९१ चौ. मीटर,प्रतीक्षा कक्ष २२६५.३६ चौ. मीटर

भक्त निवास (GF + 1F) १५३१.०२ चौ. मीटर,भव्य सभा मंडप,१२२३.६० चौ. मीटर

पायी दर्शन बारी, फूट ओव्हर ब्रिज आणि प्रवेशद्वार,७६.५० चौ. मीटर,सुरक्षा भिंत , ५२९.१८ मीटर लांबी १८५.२३ चौ. मीटर,बांधकामाची उंची व तांत्रिक अटी या बांधकामाची एकूण उंची , पॅरापेट भिंत आणि पाण्याच्या टाकीसह १३.८८ मीटर असेल, तर इमारतीची मुख्य उंची ९.११ मीटरपेक्षा जास्त नसावी असे तांत्रिक नियमांत स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात (Prohibited Area) कोणत्याही बांधकामाला सक्त मनाई असेल. तसेच, उत्खनन किंवा बांधकामादरम्यान कोणतेही पुरातत्वीय अवशेष (Archaeological remains)सापडल्यास काम त्वरित थांबवून त्याची माहिती ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’च्या (ASI) वेरूळ उप-वर्तुळ कार्यालयाला देणे बंधनकारक राहील.

प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष कायदा, १९५८ (AMASR Act) मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास ही परवानगी रद्द केली जाईल व कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय, बांधकाम सुरू करण्यापूर्वी अग्निशामक दल, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) व काम पूर्ण झाल्यावर ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (Occupancy Certificate) घेणे सार्वजनिक बांधकाम विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे.

या मंजुरीमुळे घृष्णेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या देशभरातील लाखो भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

फुलंब्री | प्रतिनिधी (एम. के. शेख) फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच…

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.