छत्रपती संभाजीनगर दि. २५ मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
आगामी काळात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंग्ज, फ्लेक्स व त्यांच्या संरचनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जाहिरात एजन्सी व होर्डिंग धारकांना तातडीचे आवाहन केले आहे.
शहरातील अनेक ठिकाणी होर्डिंगवरील फाटलेले फ्लेक्स, सैल झालेले स्ट्रक्चर तसेच विद्युत वाहिन्या किंवा इमारतींवर लटकलेले जाहिरात साहित्य आढळून येत आहे. वादळी वाऱ्यांमुळे हे साहित्य अचानक उडून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर किंवा वाहनांवर पडण्याची शक्यता असून त्यामुळे गंभीर दुर्घटना घडू शकते.
जाहिरात फलक नियंत्रण नियम २००३ तसेच महापालिकेच्या अधिसूचनेनुसार, होर्डिंग्ज सुरक्षित स्थितीत ठेवणे व त्यांची नियमित देखभाल करणे ही संबंधित जाहिरात एजन्सीची जबाबदारी आहे. होर्डिंगमुळे नागरिकांना कोणतीही हानी किंवा नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक असून, दुर्घटना घडल्यास संबंधित एजन्सीवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
याअनुषंगाने शहरातील खासगी जागा व इमारतींवरील होर्डिंग्जचे तात्काळ सुरक्षा परीक्षण करून धोकादायक साहित्य, सैल झालेले स्ट्रक्चर, फाटलेले फ्लेक्स आदी हटविण्यात यावेत. तसेच आवश्यक दुरुस्ती व देखभाल करून होर्डिंग्जची संरचना मजबूत करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही.
महापालिकेने सर्व जाहिरात एजन्सी, होर्डिंग धारक आणि संबंधित मालमत्ता धारकांना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक होर्डिंग्जबाबत महापालिकेचे आवाहन
Related Posts
Add A Comment

