छत्रपती संभाजीनगर : देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात उद्या बुधवार, दिनांक 27 रोजी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 11:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी 11:30 वाजता क्रांती चौक येथील पेट्रोल पंपावर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूकदार तसेच व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या आंदोलन
Related Posts
Add A Comment

