Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»स्वातंत्र्यवीर सावरकर १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार
छत्रपती संभाजीनगर

स्वातंत्र्यवीर सावरकर १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love


२८ मे रोजी छत्रपती संभाजीनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यवीर सावरकर १४३ वी जयंती महोत्सव समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने २८ मे रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
क्रांतिकारकांचे मुकुटमणी, साहित्यिक, महाकवी, स्वातंत्र्यवीर, मानवतावादी, प्रखर विचारवंत, राष्ट्रीय अस्मितेचे उद्गाते, स्वदेशीचे पुरस्कर्ते, परिवर्तनाचे प्रवर्तक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता समर्थ नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. सकाळी ८ ते ११.३० या वेळेत विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी ९ वाजता स्वर्गीय दत्ताजी भाले रक्त केंद्र यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, समर्थ नगर येथे होणार आहे.
तसेच परशुराम चौक, संभाजी पेठ, सावरकर चौक सिडको, त्रिमूर्ती चौक, जव्हार कॉलनी, पदमपुरा, छावणी, अविष्कार कॉलनी, चिकलठाणा, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, ज्योती नगर, सातारा परिसर, छत्रपती नगर, देवळाली चौक, रामनगर, जय भवानीनगर आदी शहरातील विविध चौकांमध्ये सावरकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत योगासन स्पर्धा, तर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत “वादळ तेजाचे – सावरकरांच्या साहित्याचे अभिवाचन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर सायंकाळी ८ ते ९.३० या वेळेत प्रख्यात गायक-संगीतकार प्रमुख सरकटे यांच्या उपस्थितीत “देशभक्ती आणि सावरकर गीतांचा स्वराज – वंदेमातरम” हा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम गोविंदभाई श्राफ सभागृह, सरस्वती भुवन प्रांगण, संभाजी पेठ बस स्थानकाजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ८.३० वाजता समर्थ नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर १४३ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर १४३ वी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जयंती महोत्सवाचे अध्यक्ष जालिंदर शेंडगे असून निमंत्रक भाऊ सुरडकर आहेत. तसेच प्रदीप बुरांडे, किशोर मानकापे, आनंद तांदूळवाडीकर, प्रमोद सरकटे, सुधीर नाईक, गोविंद कुलकर्णी, सुभाष कुमावत, किरण सराफ, विजय जहागीरदार, सुहास ठोसर, राजेश मेहता, अभिषेक कादी, संजय मांडे, सचिन गुळवे, गोपाल कुलकर्णी, दिगंबर मोरे, जगदीश हर्सुलकर, योगेश वाणी, गजानन पिंपळे, विजया कुलकर्णी, क्रांती देशमुख, साधना सुरडकर, गीता आचार्य, संध्या कापसे, विजया अवस्थी, सुनीता देव, स्मिता जोशी आदींनी संयोजन केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 17, 2026

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

फुलंब्री | प्रतिनिधी (एम. के. शेख) फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच…

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.