छत्रपती संभाजीनगर २६मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवूर परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, भरधाव वेग, विना नंबर प्लेट वाहने आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेली बेफाम वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातून, बाजारातून तसेच शाळा परिसरातूनही ही अवजड वाहने कोणतीही भीती न बाळगता भरधाव वेगात धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पादचारी, दुचाकीस्वार किंवा लहान मुले समोर आली तरी चालक वेग कमी करत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, “हायवा चालकांची अवस्था मस्तवाल हत्तीप्रमाणे झाली असून त्यांना कोणाचाच धाक उरलेला नाही. प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात निष्पाप नागरिकांचे जीव जातील,” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
विशेष म्हणजे अनेक हायवा वाहनांवर नंबर प्लेटच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हे वाहने शासकीय टेंडरअंतर्गत चालतात की अवैध वाळू वाहतूक करतात? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित वाहनांची ओळख कशी पटवणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिवूर हद्दीतील झोलेगाव येथे शासकीय टेंडर सुरू असताना “ओव्हरलोड”च्या नावाखाली जोरदार वसुली सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर काही दिवसांपूर्वी मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनाला हायवाने धडक दिल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र त्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या हायवा वाहनांवर नियंत्रण ठेवून विना नंबर, ओव्हरलोड आणि भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांनी नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शिवूर हद्दीत ओव्हरलोड, विना नंबर हायवा आणि जीवघेण्या वेगामुळे ग्रामस्थांमध्ये संताप…
Related Posts
Add A Comment

