छत्रपती संभाजीनगर, दि. 25 मे: (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी आज सकाळी महानगरपालिका मुख्यालय परिसराची पाहणी करून मुख्यालय व परिसर स्वच्छ, नीटनेटका ठेवण्यासोबतच रिकामी पडलेल्या जागांचा योग्य नियोजनबद्ध वापर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिका मुख्यालय परिसर, साईड मार्जिन तसेच अंतर्गत मार्गांची पाहणी केली. यावेळी साईड मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य, विटांचे तुकडे, फरशी तसेच उपयोगात नसलेल्या विविध वस्तू पडून असल्याचे निदर्शनास आले. या सर्व साहित्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच उपलब्ध जागेचा उपयुक्त वापर करण्यासाठी आवश्यकतेनुसार शेड उभारून दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
महानगरपालिका मुख्यालय परिसर स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, उपलब्ध जागांचा नागरिक व कर्मचारी यांच्या सोयीसाठी प्रभावी वापर व्हावा, यावर त्यांनी भर दिला.
याशिवाय आयुक्तांनी मुख्यालयातील लेखा विभाग तसेच उपायुक्त-१ कार्यालयाची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. विविध विभागांतील कामकाज अधिक कार्यक्षम, सुव्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता संजय कोंबडे, सहाय्यक आयुक्त लता पुजारी आदींची उपस्थिती होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महानगरपालिका मुख्यालय व परिसर स्वच्छ ठेवून रिकामी जागांचा योग्य वापर करा : आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश
Related Posts
Add A Comment

