छत्रपती संभाजीनगर 25 में 2026 (महाराष्ट्र न्यूज टाइम्स):
जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी सुरू असलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांना महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन मूळ शाळेतूनच अदा करण्यात यावे, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली होती.
मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने हे पत्र जारी करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अर्चना लांबे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन होऊन ते नव्या ठिकाणी प्रत्यक्ष रुजू होत नाहीत तोपर्यंत त्यांना मूळ शाळेतून वेतन देण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
दरम्यान, शिक्षक संघटनांकडून २५ मे रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रशासनाने आंदोलनापासून परावृत्त होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पत्राची प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच वेदांतनगर पोलिस ठाण्यालाही पाठविण्यात आली असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनप्रश्नी आंदोलनाचा इशारा; शिक्षणाधिकाऱ्यांचे संघटनांना पत्र
Related Posts
Add A Comment

