फुलंब्री 24 मे 2026(एस.के.शेख महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) फुलंब्री तालुक्यातील आदर्श गाव किनगाव येथे स्वर्गीय शकुंतला गंगाधर मुळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली सात दिवसीय श्रीराम कथा आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने करण्यात आली.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन गंगाधर मुळे, कल्याण मुळे आणि मंदार मुळे यांनी केले होते. सात दिवस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील हरिभक्त, भजनी मंडळे आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रामकथेला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी आदरणीय आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री अतुल चव्हाण साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वारेगाव, किनगाव, गणोरी, वानेगाव परिसरातील भजनी मंडळे, हरिभक्त पारायण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामांच्या विचारांतून सत्य, संयम, कर्तव्यनिष्ठा, आई-वडिलांचा आदर, समाजाप्रती जबाबदारी आणि माणुसकीचा संदेश मिळतो. आधुनिक काळातील तरुण पिढीने श्रीरामांच्या आदर्श जीवनातून संस्कार, शिस्त आणि समाजहिताची भावना आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात. श्रीराम कथा ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात सकारात्मक विचार आणि संस्कार रुजवणारी प्रेरणा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे सात दिवसीय श्रीराम कथा भक्तिमय वातावरणात संपन्न
Related Posts
Add A Comment

